Achievements And Awards

'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' या उपक्रमाअंतर्गत विभागीय स्तरावर मा. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे हस्ते दिव्तीय पुरस्कार स्वीकारतांना शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद

                                    मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा-२ उपक्रम

शासन स्तरावर नुकतीच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत दुसरा टप्पा राबविण्यात आला. या स्पर्धेत नवजीवन विद्यालय  ज्युनिअर सायन्स कॉलेज जमनापूर या शाळेने सहभाग घेतला. आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाने या स्पर्धेत या शाळेने विभागीय स्तरावर पुन्हा एकदा द्वितीय क्रमांक पटकावला. त्यामुळे या शाळेने याही वर्षी विभागीय स्तरावर विजेता होण्याची परंपरा कायम ठेवली. मागील वर्षीसुद्धा या शाळेला तृतीय स्थान प्राप्त केले होते.

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या उपक्रमाअंतर्गत नवजीवन विद्यालय अन्ड ज्युनिअर सायन्स कॉलेज जमनापूर या शाळेने उपक्रमातील प्रत्येक विभागातील प्रत्येक घटकाची प्रभावी अंमलबजावणी केली.

शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक संपादणूक अतिशय उत्तम, शासन स्तरावरून नियोजित सर्व उपक्रम शाळा अतिशय प्रभावीपणे राबविणे, शाळेचा परिसर हिरवागार, सुंदर, पर्यावरण पूरक वृक्षाने संपन्न आहे. शालेय इमारतीची आकर्षक रंगरंगोटी झाली आहे. शाळेतील भिंती बोलक्या आहेत. शाळेला पक्की आवारभिंत असून तिची रंगरंगोटी करी असतानी सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय संदेश देणारे चित्र काढण्यात आली आहेत. विद्यार्थी मंत्रिमंडळ लोकशाही पद्धतीने निवडले जाते. प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. परसबाग, सुसज्ज डीजीटल, स्मार्टबोर्ड असलेल्या वर्गखोल्या, गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र. जीवशास्त्र, फिशरी अश्या सर्वच विषयांच्या प्रयोगशाळा, संगणक कक्ष उपलब्धता आहे. क्रीडा स्पर्धा, नवोदय प्रवेशपूर्व परीक्षा यामध्ये विद्यार्थी सहभागी होऊन नैपुण्य प्राप्त करीत आहेत. नवजीवन बचत बँक च्या माध्यमातून बचतीचे महत्व व बँकेच्या व्यवहाराचे धडे विद्यार्थी गिरवीत आहेत. नियमित आरोग्य तपासणी, विद्यांजली पोर्टलच्या माध्यमातून मदत, समग्र प्रगती पुस्तकाची प्रभावी अंमलबजावणी, उच्च शिक्षित शिक्षक वर्ग, स्थिर इंटरनेटची सुविधा, स्वयंरोजगार, साक्षरता कार्यक्रम, वैयक्तिक आरोग्य, मासिक पाळी नियोजन यावर तज्ञ व्यक्तिंचे मार्गदर्शनपर व्याख्यान यांचे नियमित आयोजन करण्यात येते.

या संपूर्ण उपक्रमात संस्थापक अध्यक्ष डॉ. ब्रह्मानंद करंजेकर, अध्यक्ष डॉ. सोमदत्त करंजेकर, सचिव डॉ. वृंदा करंजेकर शिक्षण विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी व सहकारी मार्गदर्शक तसेच शाळेतील सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी या सर्वांचे या स्पर्धेकरिता सहकार्य लाभले,

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा २’ या उपक्रमांतर्गत नागपूर विभागात द्वितीय क्रमांक मिळाल्याबद्दल शिक्षण विभाग जि. परिषद भंडारा च्या वतीने भंडाऱ्या जिल्हा पालकमंत्री मा. श्री. संजय सावकारे, जिल्हाधिकारी मा. डॉ. संजय कोलते, आमदार मा. श्री. नरेन्द भोंडेकर, जि. पं. अध्यक्षा सौ. कविता उईके, सभापती मा. श्री. नरेशजी ईश्वरकर व शिक्षणाधिकारी मा. श्री. रविंद्रजी सोनटक्के साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.