अल्पकालीन उद्दिष्ट्ये (Short-term Goals):
१. शैक्षणिक सुधारणा: – विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीत सुधारणा करणे आणि त्यांना मूलभूत कौशल्ये प्रभावीपणे शिकवणे आणि नियमित सर्वांगीण मूल्यांकन आणि फीडबॅकद्वारे विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे निरीक्षण करणे.
२. शिक्षक प्रशिक्षण:– शिक्षकांना नवीन शिक्षण पद्धती, तंत्रज्ञान आणि शैक्षणिक साधनांसाठी प्रशिक्षण देऊन त्यांची क्षमता वाढवणे.
३. सुविधा सुधारणा:– शाळेच्या पायाभूत सुविधा सुधारणे आणि आधुनिकीकरण करणे.
४. विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवणे:– विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि खेळांमध्ये विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढवणे.
५.पालकांचा सहभाग:– पालकांशी नियमित संपर्क आणि संवाद साधून त्यांना शिक्षण प्रक्रियेत सहभागी करणे.
दीर्घकालीन उद्दिष्ट्ये (Long-term Goals):
१.सर्वांगीण विकास:– विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, सामाजिक, भावनिक आणि शारीरिक विकास सुनिश्चित करणे. तसेच त्यांना जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार करणे.
२. नागरिकत्वाची जाणीव:– विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये, समाजसेवा आणि पर्यावरणाची जपणूक याची जाणीव निर्माण करून जबाबदार नागरिक तयार करणे.
३. शैक्षणिक गुणवत्ता:– शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत सातत्याने सुधारणा करून तिला एक आदर्श शैक्षणिक संस्था बनवणे.
४. समुदायाशी जोड:– शाळेचा समुदायाशी सकारात्मक संबंध वाढवून समाजात शिक्षणाचे महत्त्व वाढवणे.
५. नवीन तंत्रज्ञानाचा वापर:- शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर वाढवून विद्यार्थ्यांना आधुनिक जगासाठी सज्ज करणे.
६. विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करणे:- विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण आणि व्यावसायिक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आवश्यक कौशल्ये प्रदान करणे.